पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इंग्रजी शालेय परीक्षेत घवघवीत यश मिळविले.या परीक्षेचा निकाल 85 टक्के लागून 26 विद्यार्थी विशेष गुणवत्तेने उत्तीर्ण झाले त्याचबरोबर 3 विद्यार्थी राज्यात प्रथम आलेले आहेत व कवठेकर प्रशालेची या परीक्षेसाठी विशेष गुणवत्तेत येण्याची मागील 25 वर्षाची परंपरा प्रशालेने याहीवर्षी कायम राखली.
या उज्वल यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही वाय पाटील यांच्याहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.यावेळी उपमुख्याध्यापक श्री नृ.बा. बडवे,पर्यवेक्षक श्री सु.शि.रुपनर व पर्यवेक्षिका सौ शु सु विश्वासे,इंग्रजी विभाग प्रमुख श्री पी पी कुलकर्णी व एन जी कुलकर्णी सर्व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.या यशाबद्दल संस्थेचे मानद सचिव श्री सु र पटवर्धन व सर्व पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले.
Comments