पंढरपूर::-आज कवठेकर प्रशाला नाथ चौक पंढरपूर येथे मतदान जनजागृती,- स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान प्रक्रियेवर आधारित रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, मतदार प्रतिज्ञा ,सायकल रॅली इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले या मध्ये सुमारे 900 विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही वाय पाटील यांनी करून मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत प्रशालेतील घेतलेल्या सर्व कार्यक्रमांची माहिती सांगितली .तद्नंतर सहा. निवडणूक निर्णय अधिकारी पंढरपूर विधानसभा श्री चरण कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मतदानाचे महत्व व कर्तव्य याची जाणीव करून दिली.
सर्व मान्यवरांचा मा.मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री चरण कोल्हे यांच्या शुभहस्ते सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. तसेच याप्रसंगी त्यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मतदानाचे मतदान प्रक्रियेची थोडक्यात माहिती सांगितली.
पंढरपूर तहसील ऑफिस मधील श्री अवसेकर यांनी लोकशाही बळकट करण्याकरिता मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. पंढरपूर प्रांत कार्यालयातील सौ बिडकर, व श्री सचिन मिसाळ (स्वीप नोडल अधिकारी अधिकारी पंढरपूर विधानसभा) तसेच श्री प्रकाश शेटे व अनिकेत कुलकर्णी (पंढरपूर सायकलर्स ग्रुप) हे याप्रसंगी उपस्थित होते सर्वांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही वाय पाटील सर याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री मुंढे सर, पर्यवेक्षक श्री रुपनर सर ज्येष्ठ इंग्रजी विभाग प्रमुख श्री एन जी कुलकर्णी सर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन श्री राजुरकर सर यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार श्री गडदे सर यांनी मानले.कार्यक्रमात चे सुत्रसंचालन कु.बिराजदार यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक बंधु-भगिनी व शिक्षकेतर बंधूंनी परिश्रम घेतले.
Nice Activities 🙏🙏👍