पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेत पालक शिक्षक संघ सहविचार सभा संपन्न झाली. या सभेस पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री. एस. आर. पटवर्धन सर अध्यक्षपदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री मंदार लोहोकरे, सहसचिवा सौ.दीपा सतपाल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्री. अभिजीत खुपसंगीकर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिक्षक पालक संघाचे सचिव श्री. समीर दिवाण सर यांनी केले. यावेळी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पत्रकार श्री.मंदार लोहोकरे, सहसचिवा सौ. दीपा सतपाल, डॉ.श्री. अभिजीत खुपसंगीकर यांचे सत्कार संपन्न झाले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एम. कुलकर्णी सर यांनी संपूर्ण शालेय नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध परीक्षा वर्ग, प्रशालेत पुढील आव्हाने व भविष्यातील योजना याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
संस्थेचे सचिव श्री. एस. आर. पटवर्धन सर यांनी मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षक पालक संघाच्या सहसचिवा सौ. दिपाली सतपाल मॅडम यांनी पालकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा व त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी व त्यावर उत्तम संस्कार करावेत, त्याचे दप्तर व मित्र नियमित तपासावेत याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
उपाध्यक्ष श्री.मंदार लोहोकरे यांनी प्रशालेतील सुरू असलेल्या विविध उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित पालकांनी शालेय कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व आपल्या पाल्याच्या प्रगती संदर्भात माहिती घेतली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक श्री. आर. जी. केसकर सर यांनी केले. पर्यवेक्षक श्री मधुकर मुंडे व श्री.आर. एस. कुलकर्णी सर यांनी उपस्थित पालकांचे स्वागत व कार्यक्रमाचे नियोजन केले.
श्री. एस.एम. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
या पालक सभेस शहरातील 600 पालक उपस्थित होते.
सर्व उपस्थित पालकांना चहापान करण्यात आले. प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर, सेवक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.
प्रशालेचा विद्यार्थी चि. तनिष्क सुहास थोरात याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली याबद्दल सत्कार संपन्न झाला.
コメント